खेड, रत्नागिरी : दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर काल सायंकाळपासून खेडमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र या मुसळधार पावसामध्ये कोकण रेल्वे मार्गावरील खेड रेल्वे स्थानकासमोर नुकतेच आठ कोटी रुपये खर्च करून सुशोभीकरण करण्यात आले या सुशोभीकरणाच्या मोठ्या शेडला ठिकठिकाणी गळती लागले असून रेल्वे स्थानक समोर अक्षरशः धबधबे पडत असल्याचा भास होत आहे.
यंदाच्या पहिल्याच पावसात खेड रेल्वे स्थानकाच्या शेडला गळती लागली होती त्याच्या दुरुस्तीचे काम देखील भर पावसात सुरू झाले होते मात्र दुसऱ्यांदा दुरुस्ती करून देखील पुन्हा गळती सुरू झाल्याचे पाहायला मिळाले.
नव्याने सुशोभीकरण करून बांधण्यात आलेल्या खेड रेल्वे स्थानकामधील शेडला गळती लागल्यामुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमध्ये मोठी नाराजी पसरली असून या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी होत आहे.