मुंबई गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील आवाशी ते लोटे दरम्यान असलेल्या सिईटीपी समोरील ब्रिज वर खड्डे पडलेले असून त्यामध्ये वाहन चालक अपघातास सामोरे जात आहेत. नुकताच कार आणि एसटी यांच्यामध्ये अपघात होऊन दोन्ही वाहनांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नसली तरी सुद्धा हे असे अपघात वारंवार होत असून येथील नागरिक आणि वाहन चालकांमधून महामार्गाच्या ठेकेदारा विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.महामार्गाच्या निकृष्ट दर्जामुळे आणखी किती लोकांचे बळी जाणार आहेत आणि किती वाहनांचे नुकसान होणार आहे?असा प्रश्न पंचक्रोशीतून उपस्थित केला जात आहे.

Google search engine
Previous articleखेडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी सखल भागात साचले पावसाचे पाणी
Next articleहरिहरेश्वर मधील हॉटेल प्रकरणातील मोठी उपडेट समोर, श्रीवर्धन पोलिसांकडून तीन आरोपीना अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here