रत्नागिरी – खेड मधील जगबुडी नदी, देवणा पूल येथे गोवंश जाणवरांची शिंगे आणि कातडी निदर्शनास आल्यामुळे खळबळ उडाली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गोवंश हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त केला जातं आहे, या घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.
खेडमध्ये मोठ्या प्रमाणावरती गोवंश जनावरांची शिंगे आणि कातडी सापडल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे, मोठ्या प्रमाणावर ती गोशाहत्या झाल्याचा संशय व्यक्त केला असून खेड मधील नागरिक संतप्त झाले आहेत, घटनास्थळी मोठी गर्दी झाल्यामुळे पोलीस आणि नागरिकांमध्ये बाचाबाची देखील झाली, पोलिसांना गर्दी हटवण्यासाठी सौम्य लाठी चार्ज देखील करावा लागला आहे, अनेक ग्रामस्थांनी नारंगी नदी वरती धाव घेऊन, तीव्र भावना व्यक्त केले आहे, परिणामी लोकांच्या भावना तीव्र झाल्यामुळे त्या ठिकाणी ज्यादा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे
संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक कर 👉🏼 Video