कोकण रेल्वे मार्गांवरील लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुअनंतपुरमला जाणाऱ्या 16345 नेत्रावती एक्सप्रेसमध्ये पनवेल ते खेड दरम्यान तुफान राडा झाला, कोकण रेल्वे मार्गावरील खेड रेल्वे स्थानकात हे नेत्रावती एक्सप्रेस तब्बल 50 मिनिटे थांबवून ठेवण्यात आली होती, यासंदर्भात पोलीस नियंत्रण कक्षात प्रवाशांनी कळवल्यानंतर खेड रेल्वे स्थानकामध्ये खेड पोलिसांनी धाव घेऊन पाच ते सहा जणांना ताब्यात घेतले आहे, दोन गटांमध्ये ही हाणामारी झाली, या संदर्भात राडा घालणाऱ्या तीन पुरुष आणि काही महिलांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, दरम्यान ज्या व्यक्तीला मारहाण झाली त्यात तो जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती मिळाली आली आहे, नेत्रावती एक्सप्रेस ही दुपारी 3:22 मिनिटांनी खेड रेल्वे स्थानाकात आली, आणि 4:12 मिनिटांनी पुढे मार्गस्थ झाली तब्बल 50 मिनिटा होऊन अधिक वेळ एक्सप्रेस खेड स्थानकात रखडली होती. मिळालेल्या माहितीनुसार सर्व प्रवासी हे पनवेल रेल्वे स्थानकात जनरल डब्यामध्ये चढले होते, पनवेल येथून ही एक्सप्रेस सुटल्यानंतर बसण्याच्या जागेवरून त्या ठिकाणी वाद निर्माण झाला, एक तरुण खेड मध्ये उतरणार होता तर इतर तीन पुरुष आणि तीन महिला या संगमेश्वर या ठिकाणचे रहिवासी आहेत पनवेल येथून शाब्दिक बाचाबाचीने निर्माण झालेल्या वादाचे रूपांतरण रोहा स्थानकापासून हाणामारीत सुरू झाले, कोणीतरी एका प्रवाशाने रत्नागिरी पोलीस नियंत्रण कक्षात टोल फ्री क्रमांकवर या संदर्भाची माहिती दिली, खेड स्थानकामध्ये दुपारी 3:22 मिनिटांनी ही एक्सप्रेस आली स्थानकात एक्सप्रेस थांबल्यानंतर देखील हाणामारी सुरू होती खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या दरम्यान नेत्रावती एक्सप्रेस तब्बल पाऊण तास खेड रेल्वे स्थानकात रखडली होती, पोलीस खेड रेल्वे स्थानकात पोहोचल्यानंतर खेड पोलिसांनी राडा करणाऱ्या व एका तरुणाला मारहाण करणाऱ्या तीन पुरुष आणि तीन महिलांना खेड पोलीस ठाण्यात आणले, मारहाण झालेला तरुण हा खेड मधील रहिवासी असल्याने, खेड पोलीस ठाण्यात मोठी गर्दी जमली, जनरल डब्यात बसण्याच्या जागेवरून निर्माण झालेल्या वादामुळे लांब पल्ल्याच्या नेत्रावती एक्सप्रेस ला तब्बल पाऊण तास रखडावे लागले, संध्याकाळपर्यंत फिर्यादीवरून कारवाई करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरु केली आहे. मारहाण करणाऱ्या तरुणांकडे गांजा असल्याचा आरोप देखील स्थानिकांकडून करण्यात आला आहे. दरम्यान मारहाण करणारे तीन पुरुष आणि तीन महिलांच्या बॅगमध्ये गांजा असल्याचा संशय स्थानिक तरुणांनी पोलिसांसमोर व्यक्त केला, या दरम्यान खेडचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर व पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी त्यांच्या बॅगा तपासले असता पाच ते सहा पुड्यामध्ये तत्सम पदार्थ आढळले मात्र हा गांजा नसून काळा तंबाखू असल्याचे प्रथम दर्शनी पोलिसांकडून सांगण्यात आले, तर त्यांच्याकडे गांजा असल्याचा आरोप देखील स्थानिक नागरिकांकडून होत होता,