तालुक्यातील शिवतर गावात शिवतर कोंढवा या मृदू व जलसंधारण विभागामार्फत मातीच्या धरणाचे काम सुरू असून धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर मातीची खोदाई झाल्याने नामदरेवाडी कडे जाणारा रस्ता पावसाळ्यात वाहून गेलाय. या रस्त्याच्या संरक्षणाकरिता ठिकठिकाणी संरक्षण भिंतींची उभारणी करून रस्त्याची तात्काळ दुरुस्त करावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे शिवतर नामदेव वाडी येथील ग्रामस्थ शिक्षण संस्थेतर्फे मृदय व जलसंधारण विभागाचे आयुक्त पुणे यांना करण्यात आली आहे. परंतु २ महीने उलटून देखील या राश्यकडे अद्याप कोणीच लक्ष न दिल्याने ग्रामस्थांमधून नाराजीचे सुर उमटू लागले आहेत.शिवतर कोंडवा या जल व मृदूसंधारण खात्यामार्फत धरण प्रकल्पाचे काम शिवतर गावात सुरू आहे. या गावातील दोन डोंगरांच्या मध्यभागी मातीची भिंत उभारून पाणी अडवले जाणार आहे. या मातीच्या कामासाठी शिवतर नामदरे वाडी रस्त्याच्या बाजूचा संपूर्ण डोंगर खोदून मातीची खोदाई करण्यात आली आहे. त्याशिवाय या भागातील मोठे मोठे दगड फोडण्यास ब्लास्टिंगचाही वापर झाला असल्यामुळे रस्त्याचा बहुतांश भाग कमकुवत झालाय. शिवतर गावातील दत्तवाडी ते नामदरे वाडी पर्यंत २.१७५ किलोमीटर लांबीचा रस्ता रत्नागिरी जिल्हा परिषद ग्रामीण मार्ग क्रमांक ६६ म्हणून नोंदवलेला आहे. भौगोलिक रचनेनुसार डोंगराळ दऱ्या खोऱ्यातून संपूर्ण रस्त्याची पूर्ण दुरावस्था झालेली आहे. त्याचबरोबर शिवतर कोंढवा धरण प्रकल्पामुळे रस्त्याच्या बाजूने दगड आणि मातीची खोदाई झाल्यामुळे १४ जुलै २०२४ रोजी मुसळधार पावसात हा रस्ता ठिकठिकाणी वाहून गेलेला आहे. त्यामुळे नामदरेवाडी कडे जाणाऱ्या या एकमेव मुख्य रस्त्यामुळे गावकऱ्यांचे पूर्ण दळणवळण बंद पडलेले आहे. तसेच या वाडीवर ये-जा करण्यास दुसरा कुठलाही मार्ग उपलब्ध नसल्याने स्थानिक नागरिकांची फार मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसह रस्त्याच्या धोकादायक बनलेल्या ठिकाणी जल व मृत संधारण विभागाने संरक्षण भिंत उभाराव्यात, अशी मागणी ही स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने शिवतर ग्रामस्थ शिक्षण संस्था मुंबई चे सचिव सुनील रामचंद्र मोरे यांनी मृद व जलसंधारण विभागाचे अप अप्पर आयुक्त तथा मुख्य अभियंता पुणे यांच्या कडे लेखी पत्राद्वारे करण्यात आली आहे.