रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये आज दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधार वादळी पावसाचा फटका खेड शहरातील डाग बंगला परिसरात येथील एका इमारतीवर महाकाय वृक्ष कोसळल्यामुळे इमारतीच्या शेडचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे मोटरसायकलचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसानझाले , मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेमुळे गेल्या तीन तासांपासून संपूर्ण तालुक्यातील 180 गावांमधील वीजपुरवठा खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आला होता.