प्रतिनिधी – मनोज भिंगार्डे
खारघर सेक्टर 21 मधील निष्ठा बंगलो येथे 42 लाख 60 हजार रुपयांची चोरी केल्याची घटना घडली होती. घरात घरकाम करणाऱ्या घरगड्याण्यानेच चोरी केली होती. असल्याचा आरोप फिर्यादी महिलेने केला आहे.
फिर्यादी सीमा सिंग या व्यावसायिक असून त्या कामाच्या निमित्ताने बाहेरगावी गेल्या होत्या. याचाच फायदा घेत तेथील घरगडी म्हणून काम करणाऱ्या दौलत परमार, राहणार शिरोही, राजस्थान, याने घरातून सोन्याचे व डायमंडचे 4 नेकलेस, सोन्याचे मंगळसूत्र, पुरुषांच्या 8 सोन्यांच्या अंगठ्या, महिलांच्या 9 सोन्याच्या अंगठ्या, 2 डायमंडच्या अंगठ्या, 5 सोन्याचे कॉइंस, 2 सोन्याच्या बांगड्या, 2 सोन्याचे ब्रेसलेट, डायमंड व सोन्याच्या अंगठ्या, लक्ष्मी देवीचा सोन्याचा फोटो, 3 जोडी सोन्याचे झुमके, गणपतीची चांदीची मूर्ती, चांदीचा कमरपट्टा, चांदीचे 3 पैंजण जोडी, चांदीची भांडी, चांदीचे बिस्किट व कॉइन व 5 लाख 10 हजार रुपयांची रोख रक्कम, असा एकूण 42 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. याबाबत सीमा यांनी घरकाम करणारा दौलत परमार याच्या विरोधात तक्रार नोंद केली होती. खारघर पोलिसांनी प्राप्त तक्रारीनुसार सिसिटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारावर आरोपी दौलत परमार याला राजस्थान येथून अटक केली असून त्याच्याजवळून 100% म्हणजेच एकूण 42 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.