कोकणचा समृद्धी महामार्ग म्हणून ओळखला जाणाऱ्या आणि रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असलेला कशेडी बोगद्याच्या दुसऱ्या बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून जानेवारी 2025 च्या अखेरपर्यंत हा बोगदा वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार असून 26 जानेवारी पासून दुसऱ्या बोगद्यातून वाहतूकीची ट्रायल घेतली जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिली आहे मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडीच्या दोन्ही बोगद्यातून पूर्ण क्षमतेने सुरक्षित आणि वेगवान करण्याच्या दृष्टीने बांधकाम प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. दोन वर्षांपासून कशेडीचा एक बोगदा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला, सुरुवातीला एक वर्ष केवळ मुंबईहून कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी तो एक बोगदा सुरू होता, मात्र त्यानंतर गेल्या वर्षापासून एकाच बोगद्यातून जाणारी आणि येणारी वाहतूक सुरू करण्यात आली होती, दुसऱ्या बोगद्याचे काम देखील प्रगतीपथावर होते, डिसेंबर अखेर हा बोगदा पूर्ण होईल असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले होते, अखेरीस कशेडीच्या दुसऱ्या बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, विद्युतीकरणाचे काम देखील अंतिम टप्प्यात आले आहे, सुरक्षितातेच्या दृष्ठिने आवश्यक असलेल्या कामांची पूर्तता काही दिवसात होणार असून कशेडीचा दुसरा बोगदा जानेवारी अखेर सुरु करण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे, या अनुषंगाने 26 जानेवारी रोजी पूर्ण झालेल्या बोगद्यातून वाहतूकीची ट्रायल सुरु करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी सांगितले आहे. राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने नवीन वर्षात कशेडीचा दुसरा बोगदा सुरु केल्या नंतर कोकण वासियांना प्रवास सुसाट होण्याची आनंदाची भेट दिली आहे. अनेक वर्ष राखडलेल्या महामार्गाच्या कामामुळे तसेच अवघड कशेडी घाटामुळे अपघात आणि अनेक समस्यांना दोनदा द्यावे लागत होते, गणेशोत्सव, शिमगोत्सव या सनांमध्ये मोठी वाहतूक कोंडी, होते मात्र कशेडीचे दोन्ही बोगदे सुरु झाल्यानंतर प्रवास सुसाट होणार यात शंका नही.