मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या आणि अवघड अशा कशेडी घाटाला पर्याय ठरलेल्या कशेडी बोगद्यातून आज पासून वाहतूक थांबवण्यात आली आहे, कशेडी बोगद्याला जोडणाऱ्या महामार्गावरील रस्त्याच्या पुलावर गर्डर बसवण्याचे काम सुरू असल्यामुळे बोगद्यातून वाहतूक थांबवण्यात आले आहे, पुढील पंधरा ते वीस दिवस बोगद्याला जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलावर गर्डर बसवण्याचे काम सुरू राहणार असल्याने कशेडी बोगद्यातून वाहतूक थांबवण्यात आल्याचे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.