बाजारात मौल्यवान असलेल्या खवले मांजर तस्करीच्या गुन्ह्यात कणकवली तालुक्यातील वारगाव येथे असलेल्या एका धाब्यावर सिंधुदुर्ग वनविभागाच्या पथकाने ५ आरोपीना रंगेहात पकडले असून यातील एक आरोपी हा अल्पवयीन आहे. जिवंत खवले मांजरासह महिंद्रा पिकअप गाडी जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई रविवारी १ डिसेंबर रोजी करण्यात आली असून विशाल विष्णू खाडये, संदीप घाडी, गिरीधर घाडी, गुरुनाथ घाडी अशी चार आरोपींची नावे आहेत. तर यातील पाचवा आरोपी १७ वर्षीय असून तो अल्पवयीन आहे तसेच सर्व आरोपींवर वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.