काळा धागा बांधण्याचे नियम

1. जाणकारांच्या मते ज्या हाताला किंवा पायात काळा धागा बांधला असेल, त्या हातात दुसरा रंगाचा धागा बांधू नये.

जेव्हा तुम्ही काळा धागा बांधाल तेव्हा त्यात 9 गाठी बांधा.

2. काळा धागा बांधताना शुभ मुहूर्ताची काळजी घ्यावी. यासाठी तुम्हाला ज्योतिषाशी संपर्क साधावा लागेल. काळा धागा वाईट नजरेपासून रक्षण करतो आणि जीवनातील समस्या दूर करतो.

3. घरातील कोणताही सदस्य किंवा मूल वारंवार आजारी पडत असेल आणि त्याचा आजार औषधाने बरा होत नसेल तर त्याच्या कंबरेला काळा दोरा बांधावा. यामुळे मुलाचे आजार बरे होतील आणि उपचाराचा लाभ लवकरच मिळेल.

4. शास्त्राचे जाणकार सांगतात की, काळा धागा घाला बांधल्यानंतर रोज गायत्री मंत्राचा जप करावा. घराच्या दारावर काळ्या धाग्यात लिंबू आणि मिरची लटकवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा संचारीत.

5. जर तुमच्या मुलाची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली असेल तर मुलाच्या पायावर काळा धागा बांधा, असे केल्याने बाळ कमी आजारी पडेल.

राहू-केतू आणि शनीच्या महादशापासून होतो बचाव

पत्रिकेतील कोणत्याही ग्रहांचा प्रभाव कमजोर असेल तर व्यक्तीच्या जीवनात समस्या सुरू होतात. ज्योतिषशास्त्रानुसार पायावर काळा धागा बांधल्याने शनीची महादशा, साडेसाती आणि अडिचकीचा प्रभाव कमी होतो. यासोबतच पत्रिकेत शनि ग्रहाला बळ मिळते. पत्रिकेत राहु-केतू कमजोर असेल तर ज्योतिषी पायात काळा धागा बांधण्याचा सल्ला देतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Google search engine
Previous articleपंढरपूरवरून परतताना भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; 3 जण ठार
Next articleHSC Result 2023: बारावीचा निकाल जाहीर, यंदाही कोकण विभागाची बाजी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here