रत्नागिरी – जिंदाल कंपनीमधून वायुगळती झाली आहे. जयगड येथील नांदीवडे माध्यमिक विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना वायुगळतीचा त्रास झाला आहे. मुलांना डोळ्यांना जळजळ, श्वसनाचा आणि उलट्यांचा त्रास झाल्याने तत्काळ उपचार साठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहिती नुसार 35 ते 40 विद्यार्थ्यांना या वायु गळतीचा त्रास झाल्याचे समोर येतेय. काही विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात, तर काहीना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जिंदाल कंपनीच्या टाक्यांचा मेंटेनन्स सुरू असताना हा गॅस लिकेज झाल्याचा संशय समोर येत आहे.