आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने कोकणासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे . गेल्या वर्षी झालेल्या ढग फुटीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड , चिपळूण , राजापूर या ठिकाणी नद्यांना महापूर येऊन मोठी जीवित आणि वित्त झाली होती या पार्शवभूमीवर जलसंपदा विभागाच्या जलविज्ञान प्रकल्प नाशिक च्या माध्यमातून कृष्ण खोऱ्याच्या धर्तीवर रत्नागिरी जिल्ह्यासाठी R.T.D.A .S. सिस्टीम म्हणजेच रियल टाइम डेटा acqusition सिस्टीम. कार्यान्वित करण्यात आली आहे . रत्नागिरी जिल्ह्यात ९ ठिकाणी A.R.S. म्हणजेच ऍटोमॅटिक रेन सोर्स स्टेशन आणि तीन ठिकाणी A.W.L.R म्हणजेच एटोमॅटिक वॉटर लेव्हल रेकॉर्ड सिस्टीम बसवण्यात आली आहे .
एटोमॅटिक वॉटर लेव्हल रेकॉर्ड सिस्टीम रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड मधील जगबुडी नदी , चिपळूण येथील बहाद्दूरशेख नाका येथील वाशिष्ठी नदी आणि राजापूर येथील अर्जुन नदी या तीन ठिकाणच्या नद्यांवर बसवली आहे .
जलसंपदा विभागामार्फत एक लिंक देखील जरी केली आहे या लिंक वर क्लिक केल्यानंतर जिल्ह्यातल्या तीन नद्यांच्या पाण्याची पातळी आणि नऊ ठिकाणच्या पावसाच्या प्रमाणावर लक्ष ठेवता येणार आहे.
जलसंपदा विभागामार्फत जिल्ह्यात बसवण्यात आलेल्या या यंत्रणा अतिशय महत्वाची असून या यंत्रणेमुळे नद्यांची पातळी वाढल्यास नदीच्या आसपास च्या गावांना तात्काळ अलर्ट देणे शक्य होणार आहे , एवढेच नाही तर पावसाचे प्रमाण वाढल्यास नियंत्रण कक्षा मार्फत नागरिकांना अलर्ट करणे देखील आता सहज शक्य होणार आहे.