कोरोनाच्यासंसर्गामुळं मागील दोन वर्ष ऑनलाइन शिक्षणसुरू होतं. त्यावेळी दरवर्षीप्रमाणं शालेय साहित्याची विक्री झाली नाही. मात्र, यावर्षी शाळेची घंटा वाजली असून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं आहे. शालेय साहित्याने बाजारपेठ सजली असून, पालकही साहित्य खरेदीसाठी दिसून येत आहेत. पण, यंदा शैक्षणिक साहित्य महागलंअसून त्यामध्ये 10-20 टक्क्यांनी दरवाढ झाल्याची पहायला मिळत आहे. वाढत्या महागाईमुळं त्रस्त झालेल्या पालकांच्या खिशाला शालेय साहित्य दरवाढीनं कात्री लागत आहे.
उन्हाळी सुट्टीनंतर पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोनाच्या सावटामुळं शाळांचा घंटा आणि विद्यार्थ्यांचा किलबिलाट ऐकायला मिळत नव्हता. कोरोनाचे घटते प्रमाण आणि लसीकरणामुळं अकोल्यातही काही शाळा सुरू झाल्या आहेत. बच्चे कंपनी खूप दिवसांनी शाळेत जायला मिळाल्यामुळं खूश आहेत. नवं दप्तर, नवीन कपडे, नवी पुस्तके आणि वह्या, अशा सगळ्या शालेय वातावरणात मुले शाळेत जाताना दिसत आहे.
सध्या काही शाळा सूरू झाल्या आहेत. मात्र, यंदा शैक्षणिक साहित्य महागले असून यात पेन, पेन्सिल, कंपासपेटी, दप्तर, पाटी, पुस्तक, गणवेश अशा साहित्याचा समावेश आहे. या माहागाईचा फटका फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. शाळेसाठी लागणारे गणवेशाचे भाव हे आधीपेक्षा 10 ते 20 पटीने वाढले आहेत.
सर्वच गोष्टींच्या किमती वाढल्या आहेत, त्यात कपड्यांचेही भाव वाढले आहेत. कपडे शिवण्यासाठी लागणारी शिलाई, कपडा, मजुरी यांच्या किमती वाढल्या आहेत. त्यातच सध्या गणवेशाचा स्टाॅक कमी असल्याचं व्यापारी सांगत आहेत, पैसे देऊनही आता वेळेत कपडे मिळत नाहीत. परिणामी गणवेशाचे दर वाढले आहेत.