राज्याचा बारावीचा निकाल यंदा 91.25 टक्के एवढा लागला आहे. बारावीच्या निकालात कोकण विभाग सर्वात अव्वल राहिला आहे. यंदा HSC बोर्डाची परीक्षा कोणत्याही कोविड निर्बधांशिवाय पार पडली.
25 मे दिवशी म्हणजेच आज दुपारी 2 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर सर्व विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे. ऑनलाईन निकाल जाहीर करण्यापूर्वी शिक्षण विभागाने पत्रकार परिषद आयोजित केली होती ज्यात शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार आज निकाल mahresult.nic.in सह अन्य अधिकृत वेबसाईट्सवर जाहीर झाला आहे.