Horoscope Today 13 July 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 13 जुलै 2025, आजचा वार रविवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, कारण आज सकाळी शनि वक्री होणार आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. शनिदेव आणि सूर्यदेवाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज तुमचे नेतृत्व, पुढारीपणा, अधिकार याला झळाळी येईल, महिला मिळालेल्या संधीचा उपयोग करून घेतील

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो खूप दिवस वाट पाहत असलेले आर्थिक प्रश्न सुटणार आहेत, मोठ्या खरेदीचा मोह होईल

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज घरातील काही गोष्टींसाठी पैसा खर्च कराल, कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण राहील

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज मन स्वास्थ्य लाभेल, परंतु तुमच्या मुडी स्वभावाचे दर्शनही इतरांना घडेल

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो आज खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी असा स्वभाव असल्यामुळे निर्मळ आनंद उपभोगु शकणार नाही

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज वाहने जपून चालवा, प्रकृती स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो एखाद्या विचाराने संकट ओढून घ्याल, आपली महत्त्वाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नको त्या मार्गाचा अवलंब न करणे चांगले

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज दुटप्पी वर्तन हितकारक ठरेल, कोणतेही काम पूर्ण होईपर्यंत घोषणा करू नका

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज महिलांनी प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, तुमच्याशी जे गोड बोलतील त्या व्यक्ती तुमच्या मर्जीत राहतील

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज वैवाहिक जीवनात थोडी वादळी निर्माण होतील, मतभेद सामंजस्याने सोडवणे हितकारक ठरेल

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज कोणत्याही गोष्टी खूप ताणू नका, जुनी दुखणे डोके वर काढतील

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज सांधेदुखी पाठदुखीचा त्रास संभवतो, कलाकारांना मात्र चांगल्या संधी मिळून त्यांच्या कलेचे चीज होईल.

Google search engine
Previous articleमुंबई गोवा महामार्गावर तिहेरी अपघात; रिक्षा,मारुती स्विफ्ट कार आणि दुचाकी यांच्यात अपघात
Next articleखेड बसस्थानकामध्ये घडली दुर्घटना; बसस्थानकाच्या संरक्षक भिंतीचा भाग कोसळला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here