पुणे, 12 जून : सिंहगडावर (Sinhagad fort) गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला (Bees attack) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत 8 ते 10 पर्यटक जखमी झाले असून दोन पर्यटक बेशुद्ध झाल्याची माहिती समोर आली आहे.जखमींना तातडीने गडावरून खाली आणण्यात आले आहे. सेल्फी (selfie) काढण्याच्या नादात एका तरुणामुळे हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. तरुणांनी दिलेल्या माहितीनुसार, किल्यावरील मागच्या बाजूस असलेल्या कल्याण दरवाज्याजवळ हा प्रकार घडला. जिथे काही उत्सही पर्यटक गेले होते, त्यातील एका तरुणाने कल्याण दरवाज्याजवळ असलेल्या झाडावर अनेक मोहोळ लागलेली आहेत.
त्यापैकी एका मोहोळाजवळ जाऊन सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत केला. मात्र सेल्फी येत नसल्याने तरुण अधिकजवळ जाण्याच्या प्रयत्न करत होता. तेवढ्यात झाडाची फांदी तुटली आणि मधमाशा सहित मोहाळ खाली पडले. तरुणही खाली पडला आणि मधमांशांनी त्याच्यावर जोरदार हल्ला केला.
तिथेच आजूबाजूला असलेल्या पर्यटकावर देखील मधमाशा तुटून पडल्या आणि मधमाशाच्या हल्ल्यात आठ ते दहा पर्यटक जखमी झाले तर दोन जण बेशुद्ध पडले. घटनेबद्दल माहिती मिळताच गडावरील काही स्थानिक तरुणांनी जखमींन हत्ती दरवाज्याकडे आणलं आणि मधमाशांना दूर पळवण्यासाठी धूर केला. मधमाशाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या काही पर्यटकांना चालता येत नसल्याने त्यांना झोळीत टाकून रुग्णवाहिनीपर्यंत नेण्यात आलं आणि तिथून सर्व जखमींना घेऊन गडाखाली आणल्याची माहिती मिळली आहे.
स्थानिक गावकरी ओंकार पढेर, अमोल पढेर, चंद्ररंग चरिटेबल ट्रस्ट,पिंगळे गुरव-पुरातत्व विभागाचे भाऊ जोरकर, दत्ता जोरकर, वनविभागाचे बाबासाहेब लटके,वनरक्षक बाळासाहेब जिवडे,संदीप कोळी, घेरा सिंहगड वनसंरक्षण समितीचे कर्मचारी विकी दुधाने, इतर स्थानिक कार्यकर्ते मदतीला धावून आलेत. दरम्यान, आज रविवार सुट्टी असल्याने सुमारे चार किलोमीटरच्या रांगा लागल्या असून त्यातून आलेल्या पर्यंटकांची मोठी गर्दी आहे.