दिपावली पाडव्याच्या मुहूर्तावर सिंधुदुर्गातील मालवण-कुंभारमाठ येथून हापूस आंब्याची पहिली पेटी नाशिकला रवाना झाली आहे.जुलै महिन्यातील पावसाळ्यात आलेला मोहोर टिकवून कोकणातून हापूस आंब्याची पहिली पेटी बाजारात आली आहे. चार डझन हापूस आंब्याची पहिली पेटी नाशिक जिल्ह्यातील सिन्नरला काल रात्री मालवण येथून रवाना झाली. मालवण कुंभारमाठमधील आंबा बागायतदार उत्तम फोंडेकर यांनी ही हापूस आंब्याची पहिली बाजारात आणली.