संपूर्ण कोकणात गेल्या काही दिवसांपासून पर्यटकांची गर्दी वाढू लागलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे, गुहागर बीच, दापोली हर्णे-मुरुड,आंजर्ले या भागात मुंबई पुणे आणि राज्यासह देशभरातून पर्यटकांची गर्दी वाढताना दिसत आहे. रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथे शनिवार आणि रविवार या दोन दिवशी पर्यटकांची गर्दी खूपच वाढलेली दिसून आली होती. सध्या थंडीच्या दिवसातही पर्यटक मोठ्याप्रमाणावर समुद्र किनाऱ्यांकडे वळताना दिसत आहेत. त्यामुळे रत्नागिरी, गुहागर, दापोली येथील हॉटेल फुल्ल झालेले दिसत आहेत.