रत्नागिरी येथील गणपतीपुळे किनाऱ्यावर शनिवारी (20/5) दुपारी मृत डॉल्फिन मासा आढळून आला. हा मासा पाहण्यासाठी पर्यटकांनी केली गर्दी होती. माशाच्या दुर्गंधीने पर्यटकांना त्रास होऊ नये यासाठी जीवरक्षकांनी किनाऱ्यावर खड्डा खोदून पुरून पुरून टाकण्यात आला.
गणपतीपुळे मंदिरासमोर दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास मृत डॉल्फिन मासा समुद्राच्या लाटांबरोबर किनाऱ्यावर वाहत आला. सुरुवातीला तो जीवंत असल्याचे पर्यटकांना वाटले; पण मासा पाहिल्यानंतर तो मृत असल्याची खात्री झाली. त्याला गादा मासा असेही म्हटले जाते. किनाऱ्यावर फिरायला आलेल्या पर्यटकांसह व्यापाऱ्यांनी गर्दी केली होती. माशाच्या शेपटीजवळ जखम झाल्यामुळे त्याला अपघात झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याच्या शरीरावरील कातडीही निघून गेली होती. कदाचित त्याचा मृत्यू होऊन बराच कालावधी झाला असावा. समुद्राच्या खऱ्या पाण्यात असल्यामुळे माशाचा भाग कुजलेला नसला तरीही थोडी दुर्गंधी येत होती. हा मासा जास्त काळ किनाऱ्यावर राहिला असता तर पर्यटकांना दुर्गंधीचा सामना करावा लागला असता. त्यामुळे किनाऱ्यांवरील लोकांनी तो किनऱ्यावर वाळूमध्ये खड्डा खोदून पुरला. दरम्यान, डॉल्फिन माशाचा रत्नागिरी, गुहागर आणि दापोलीतील किनारी भागात वास्तव्य आहे. अनेक पर्यटक माशांना पाहण्यासाठी समुद्रात सकाळी गर्दी करत असतात.