खेड : खेड नगरपालिकेच्या कर्मचारी वसाहतींमध्ये नव्याने अनधिकृत खोके उभारून संपूर्ण वसाहतीस धोका होईल, अशी परिस्थिती निर्माण केली जाते आहे. त्याकडे तातडीने लक्ष देऊन हे खोके हटवावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी पालिकेकडे निवेदन देऊन केली आहे. या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन पालिकेचे मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांनी दिले आहे.

कर्मचारी वसाहत समर्थनगर साईमंदिरजवळ असून या वसाहतीतील ९ इमारती असून त्यातील एक पडीक आहे. १७ कुटुंबांची व्यवस्था असून त्याच्या पूर्वेकडील भागात जो मुख्य रस्ता जगबुडीकडे जातो त्याला लागून पूर्वी दोन खोकेवजा गाळे होते. आता ६ गाळ्यांची व्यवस्था करून ते कोणासाठी पालिका देणार, याचा उलगडा झालेला नाही. मर्जीतील कोणाला देण्यासाठी ही जागा आहे काय, असा प्रश्न पाटणे यांनी या निवेदनाद्वारे पालिकेला विचारला आहे. ज्या व्यक्तींनी त्यासाठी योगदान दिले त्या व्यक्तींचा हा अपमान असून हे बेकायदेशीर गाळे काढण्यात यावेत.

तसेच या जागेमध्ये भविष्यात नगर पालिकेस काही मोठे बांधकाम प्रोजेक्ट करायचे असल्यास ते अडचणींचे ठरणार आहेत. आजसुद्धा या गाळ्यांमुळे वसाहतीमध्ये जरूर पडल्यास एखादे मोठे वाहन आणणेदेखील जमणार नाही. त्यामुळे हे गाळे ताबडतोब हटवावेत. तसेच या वसाहतीच्या पश्चिमेला एका लगतच्या हद्ददाराने जागेत १९ ते २० फूट आत येऊन अतिक्रमण केले आहे. पालिकेने हे अतिक्रमण हटवून भूखंड मोकळा करावा.

Google search engine
Previous articleसिंधुदुर्गनगरी : जातीय अत्याचाराविरोधात मडका फोड मोर्चा
Next articleअज्ञाताकडून शाळा खोल्यांची नासधूस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here