बंडाच्या तिसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे बॅकफूटवर खेळण्याच्या तयारी! आता प्रत्येक क्षण महत्त्वाचा

- Advertisement -

 

एकनाथ शिंदे यांच्या कडे 37 पेक्षा जास्त आमदार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र शिंदे राज्यपालांना देणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती.मात्र, शिंदे आजही बँकफूटवर खेळणार असल्याची माहिती आहे. शिंदे गोवा किंवा मुंबईत जाणार नसल्याची माहिती आहे. यामुळे पुन्हा एकदा शिंदे नेमकं काय करणार, असा प्रश्न निर्माण झालाय. अधिक माहितीनुसार दोन तृतीआंश शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता पक्षांतर बंदी कायद्याचा कोणताही परिणाम शिंदे यांच्यावर होणार नाही, हे स्पष्ट झालंय. मात्र, हे असलं तरी शिंदे आजही शांत राहणार असल्याचं कळते. त्यामुळे शिंदेंच्या बँटफूटवर खेळणार असल्याची बोललं जातंय. राज्यात घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक क्षण महत्वाचा मानला जातोय.

37चा आकडा गाठला?
शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदेंच्या गटातील आमदारांची संख्या वाढणार असून शिवसेनेला खिंडार पडत चाललंय तर दुसरीकडे शिंदे गटाला बळकटी मिळतेय. 37चा आकडा गाठण्यासाठी एकनाथ शिंदे गटाकडून प्रयत्न केले जातायत. आज पुन्हा 3 आमदार गुवाहाटीमध्ये दाखल झाले असल्याची माहिती सूत्रांची दिली आहे. यामुळे शिंदे 37चा आकडा गाठण्यात यशस्वी ठरणार असल्याची बोललं जातंय. शिंदे गटाकडून 37चा आकडा गाठल्यास त्यांच्यावर पक्षांतर्गत कायद्यानुसार कारवाई होणार नसून ते वेगळा गट स्थापन करू शकतात. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का मानला जातोय. यातच आता एक माहिती समोर आलीय. महाराष्ट्रातील सहा आमदार नॉटरिचेबल असल्याची माहिती आहे. यामुळे आता हे आमदार एकनाथ शिंदे गटाला मिळणार का, हा देखील प्रश्न सध्या चर्चीला जातोय.

तज्ज्ञ काय म्हणाले?
आता जी आकडेवारी समोर आली आहे त्यानुसार एकनाथ शिंदे यांनी खेळ जिंकला, असं म्हणावं लागेल. पण हे आकडे सातत्यानं बदलत आहेत. त्यामुळे लगेच यावर भाष्य करता येणं कठीण असल्याचं ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक भारतकुमार राऊत यांनी म्हटलंय. एकनाथ शिंदे यांच्याकडे नेमका किती आकडा आहे, हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही. शिंदे यांनी यादी सादर केल्यानंतर नेमकं समीकरण स्पष्ट होईल. या यादीची पडताळणी केली जाईल. त्यानंतरच पुढील समीकरणं कशी होतात, यावर बोलणं संयुक्तिक ठरेल. आताच यावर भाष्य करणं घाईच होईल, असंही ते म्हणालेत.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

12,546FansLike
75,569FollowersFollow
2,564FollowersFollow
191,558SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles