सातारा- बारामतीच्या २२ वर्षीय तरुणावर स्टेम सेल्स ट्रान्सप्लांट करून यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.
सातारा येथील ॲान्को लाईफ कॅन्सर सेंटर हे रुग्णासाठी जीवनदायी ठरले असून हिमॅटोलॉजिस्ट डॉ विनोद पाटील आणि त्यांच्या टिमच्या प्रयत्नांना यश मिळाले. रुग्ण हा ए एल सी एल प्रकारच्या लिम्फोमा कॅन्सरने पिडीत असून २०१९ साली केमोथेरपी घेतल्यानंतर २०२१ साली या रुग्णाला पुन्हा एकदा तोच आजार उद्भवला . रुग्णाला हाय डोस केमोथेरपी देऊन रुग्णाचा आजार आटोक्यात आणला.आजार पुन्हा होऊ उद्भवू नये यासाठी त्याला स्टेम सेल्स ट्रांसप्लांटचा पर्याय देण्यात आला.विविध ट्रस्टकडून व पेशंटने स्वतः काही खर्च करुन ट्रांसप्लांट साठी रक्कम जमा केली त्यानंतर रुग्णाच्या स्टेम सेल्स पहिल्याच प्रयत्नात मिळविन्यात यश आले. त्यानंतर त्याला हायडोज केमोथेरेपी देउन मग स्टेम सेल्स देण्यात आल्या.त्यानंतर त्याला संडास पातळ होणे व ताप येण्याचा त्रास झाला .त्यासाठी योग्य उपचार केल्यावर रुग्ण बरा झाला .परंतु त्याच्या पेशी वाढन्यास तुलनेने वेळ लागला व त्यानंतर त्याच्या प्लेटलेट्स ही वाढल्या व रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला.
हिमेटोलॉजिस्ट डॉ. विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य डॉक्टरांच्या टीमने हे यशस्वी स्टेम सेल्स ट्रांसप्लांट करत रूग्णाला जीवनदान दिले आहे. डॉ विनोद पाटील यांना ऑन्को लाईफ़ कॅन्सर सेंटरचे अध्यक्ष श्री. उदय देशमुख यानी शुभेच्छा दिल्या .ह्यावेळी डॉ विनोद पाटील यांनी ऑन्को लाईफ़ कॅन्सर सेंटर चे अध्यक्ष श्री उदय देशमुख संचालक डॉ. प्रताप राजेमहाडिक , डॉ. मनोज तेजानी यांचे आभार मानले. डॉ. प्रसाद कावरे, डॉ. रेवती पवार, डॉ शुभांगी कणसे, डॉ. रसिका डोंबाले, श्री. प्रेमराज पाटील, या साऱ्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे हे स्टेम सेल्स ट्रांसप्लांट यशस्वी पार पडले.