चिपळूण – राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमानुसार भारतात अंधत्वाचे प्रमाण 2% पेक्षा जास्त आहेत. ज्यामध्ये मोतीबिंदूमुळे येणारे अंधत्व हे पहिले तर कॉर्नियल अंधत्व हे दुसरे अशी दोन प्रामुख्याने आढळून येणारी कारणे आहेत. कॉर्नियल अंधत्व असलेल्या व्यक्ती या सुविधांची कमतरता / अनुपलब्धता किंवा आर्थिक समस्यांमुळे दुर्लक्षित राहतात. कॉर्नियल अंधत्व या समस्येवर एकमेव उपचार म्हणजे नेत्ररोपण शस्त्रक्रिया (कॉर्नियल ट्रान्सप्लांट). लाईफकेअर हॉस्पिटल हे संपूर्ण कोकणातील एकमेव HOTA मान्यताप्राप्त (प्रमाणित) नेत्ररोपण केंद्र (कॉर्निया ट्रान्सप्लांट सेंटर) आहे.
एका 80 वर्षीय रुग्णाची अनेक महिन्यांपासून डाव्या डोळ्याची दृष्टी कमी झाली होती व डोळा दुखत असल्याची तक्रार घेऊन हे रुग्ण आमच्या हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यांची दृष्टी खूपच खराब झाली होती. स्लिट लॅम्प तपासणीनंतर रुग्णाला कॉर्नियाला डाग (पांढरट पडल्याने अस्पष्टता) असल्याचे निदान झाले. डाव्या डोळ्याच्या नेत्ररोपणाची आवश्यकता होती.
ह्या वेळी नेत्ररोगतज्ञ डॉ नदीम खतीब यांनी माहिती दिली की कॉर्नियासह कोणतेही प्रत्यारोपण करण्यासाठी आम्हाला ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन ॲक्टची (HOTA) मान्यता प्राप्त होणे आवश्यक होते. आता रत्नागिरी जिल्ह्यातील आपण लाईफकेअर हॉस्पिटल हे एकमेव ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन ॲक्ट (HOTA) प्रमाणित केंद्र आहोत. या प्रक्रियेसाठी आवश्यक कॉर्निया नेत्र दाता किंवा आय बँकेमधून उपलब्ध होऊ शकतो. आय बँकेमध्ये प्रिझर्व करून ठेवलेला कॉर्निया ४ दिवसांच्या आत वापरावा लागतो. आम्ही मुंबई, पुणे, सांगली इ. ठिकाणच्या नेत्रपेढ्यांशी संलग्न आहोत. कोल्ड चेन पद्धतीने कॉर्नियल टिश्यूची वाहतूक केली जाते.
09 फेब्रुवारी 2022 रोजी वर उल्लेख केलेल्या रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर आता रुग्णाची प्रकृती उत्तम असून त्यांची दृष्टी सुधारली आहे. काही दिवसांनी सदर रुग्ण चष्म्याच्या मदतीने व्यवस्थित पाहू शकतिल.
कोकणातील ही पहिलीच नेत्ररोपण शस्त्रक्रिया असून ती यशस्वी झाल्यामुळे कोकणातील रुग्णांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. आता कॉर्निया ट्रान्सप्लांटसाठी रुग्णांना मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज नाही.ही सुविधा येथील लाईफकेअर हॉस्पिटल मधे उपलब्ध आहे.