मुंबई : राज्यात करोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने थोड्याच दिवसांनी सुरु होणाऱ्या दिपावली उत्सवासाठी नियमावली जाहीर केली आहे. येत्या 2 ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या दिवाळीसाठी राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोना झालेल्या आणि होऊन गेलेल्या नागरिकांना फटाक्यांच्या धुरामुळे त्रास होण्याची भीती आहे त्यामुळे चालू वर्षी फटाके फोडणे टाळावं, असं आवाहन राज्य सरकारने केलं आहे. (The state government has issued guidelines for Diwali celebrations)
कोविडचा प्रादुर्भाव विचारात घेऊन गेल्या दीड वर्षांपासून सर्व धर्मीय सण/उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने आणि लोकांनी एकत्रित न येता साजरे केले आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन गर्दी करुन उत्सव साजरा करु नये, उत्सव साजरा करताना सर्व नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेणं आवश्यक आहे, असं आवाहन राज्य सरकारने केलं आहे.
राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना
– दिव्याची आरास करून उत्सव साजरा करावे
– राज्यातील धार्मिक स्थळे खुली केली असली तरी दिवाळी उत्सव घरगुती स्वरूपात मर्यादेत राहील याची दक्षता घ्यावी
– खरेदीसाठी बाजारात गर्दी टाळावी
– ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी घराबाहेर जाणे टाळावे
– दिवाळी पहाट कार्यक्रम नियमानुसार होतील