आज दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच आज धनत्रयोदशी.आज घरामध्ये सायंकाळी अलंकाराची, धनाची पूजा केली जाते. जे दागिने सुरक्षेच्या दृष्टीने आपण तिजोरीत ठेवतो, ते आजच्या दिवशी बाहेर काढून, लखलखीत करून त्यांची पूजा केली जाते.
गणपती, विष्णू-लक्ष्मी, कुबेर, योगिनी, नाग तसेच नाणी नोटांच्या रुपातील द्रव्यनिधी यांची पूजा करण्याचा प्रघात आहे. धनस्वरुपातील लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. व ही सर्व पूजा झाली, की यमराजासाठी आठवणीने खास दिवा लावला जातो. त्यालाच यमदीपदान असे म्हणतात.
या सणामागे अशी अख्यायिका आहे की, कृष्णपक्षांच्या त्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी समुद्र मंथन दरम्यान त्यांच्या हातात अमृत कलश घेऊन प्रकट झाले. भगवान धन्वंतरी वैद्यकीय विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी अवतार घेतल्याचे मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्यास पैशाची आणि धान्याची कमतरता भासत नाही. या दिवशी आणि लक्ष्मी-गणेशची मूर्ती देखील या दिवशी घरात आणावी. धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी दिवे लावण्याची प्रथा देखील आहे. याला यमदीपक असेही म्हणतात.
दरवर्षी दिवाळीचा एक वेगळाच उत्साह लोकांमध्ये दिसून येतो. मात्र कोरोनाचे संकट अजूनही गेलेले नाही आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी साधेपणाने साजरा करावी लागणार आहे. असं असताना ही,दिवाळीचा उत्साह अजिबात कमी होऊ देऊ नका.सोशल मीडियाच्या माध्यमातून दिवाळीच्या शुभेच्छा आपल्या नातेवाईकांना आणि मित्र परिवाराला नक्कीच देऊ शकता.