खेड, रत्नागिरी – कोकण रेल्वे मार्गावरील खेड ते आंजनी रेल्वे स्टेशन दरम्यानच्या’ शिव बुद्रुक’ भोईवाडी आणि सोनारवाडी दरम्यानच्या रेल्वे रुळाजवळ, गस्त घालताना एक अज्ञात मृतदेह रेल्वे कर्मचारी यांना दिसून’ आला. हा मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या स्थितीत आढळून आल्याने अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. येथील खेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.