दापोली : दापोली – मंडणगड तालुका पेंशनर संघटनेची नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाची पदाधिकारी निवडीची पहिली सभा दि. १ नोव्हेंबर २०२१ रोजी पेंशनर सभागृह येथे पार पडली .सदर सभेमध्ये दापोली मंडणगड तालुका पेंशनर अससोसिएशन चे अध्यक्षपदी श्री शिवाजीराव कदम निवृत्त मंडळ अधिकारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली .त्याच प्रमाणे उपाध्यक्ष दापोली तालुका पदी श्री. मनोहर पवार ,उपाध्यक्ष मंडणगड तालुका पदी विजयराव भागवत ,सचिव पदी प्रेमानंद महाकाळ ,सहसचिव पदी श्री शरद जाधव व खजिनदार पदी श्री विजय बेर्डे यांची बिनविरोध निवड करण्यात आली .शासकीय कार्यपद्धतीचा प्रदीर्घ अनुभव ,समाजकार्याची आवड व सर्व पदाधिकाऱ्यांच्या साथीने दापोली मंडणगड पेंशनर सभासदांना न्याय मिळवून देणे व शासकीय कामे मार्गी लावून त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यास व घटनात्मक तरतुदी अन्वये कामकाज करणेस कटिबद्ध असल्याबाबत चे मनोगत मा. अध्यक्ष श्री.शिवाजीराव कदम माझे कोकणशी बोलताना व्यक्त केले .सर्व सभासदांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.