दापोली : दिपावली हा नात्याला ऋणानुबंध करणारा माणुसकी आणि नम्रतेचा दिप उत्सव आहे.दोन दिवसावर आलेला दिवाळी सण आपल्या प्रमाणे वृद्धाश्रमात देखील साजरा व्हावा आणि त्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा या उद्देशाने पोलीस मित्र मंडळ, दापोली या संघटनेने दापोलीतील दातार वृद्धाश्रमाला दिपावली निमित्त भेट घेऊन तेथील आजी आजोबांना दिवाळी फराळ देण्यात आला.सर्वांशी मनमोकळ्या गप्पा मारत त्यांनी त्यांच्या आयुष्यातील प्रसंग सांगून दिलखुलास गप्पा गोष्टी केल्या.

या भेटीमध्ये पोलिस मित्र संघटना दापोली तालुका अध्यक्ष श्री. महेंद्र खैरे,दापोली शहर अध्यक्ष. सुहेल काद्री, शाहिन काद्री,पदाधिकारी साक्षी करमारकर,अनाफ मेमन,प्रितम केळकर, मृणाली खळे ,सपना दुबळे, तेजल घोत्रे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. वृद्धाश्रम संचालक मंडळाकडून पोलिस मित्र संघटेनचे आभार मानले.वृद्धाश्रमाला शक्य ती मदत संघटना नक्कीच करत राहिल व इतरांनीही मदत करावी असे आवाहन तालुका अध्यक्ष श्री.महेंद्र खैरे यांनी केले.

Google search engine
Previous articleकोकणातील हक्काचे व्यासपीठ असलेल्या माझे कोकणचे प्रिंट मिडियात दमदार पाऊल .. मंत्री अनिल परब यांच्या हस्ते पार पडला पहिल्या दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा
Next articleदापोली – मंडणगड तालुका पेंशनर संघटनेच्या अध्यक्षपदी श्री. शिवाजीराव कदम यांची नियुक्ती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here