प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने खून केल्याची घटना रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीत घडली आहे. अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. संशयित आरोपी म्हणून पत्नी नेहा निलेश बाक्कर व तिचा प्रियकर मंगेश चिंचघरकर याला दापोली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली गिम्हवणे गावात निलेश बाक्कर यांचा सलूनचा व्यवसाय होता. मात्र ते सोमवारीपासून बेपत्ता होते. त्यामुळे निलेश यांच्या भावाने आपला भाऊ बेपत्ता झाल्याची फिर्याद दापोली पोलीस स्थानकात दिली होती. त्यानुसार दापोली पोलिसांनी पत्नीकडे चौकशी केली असता तिच्या जबाबात तफावत आढळून आली, पोलिसांनी नेहा बाक्कर ज्या हॉटेलमध्ये कामाला होती, त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ते दोघेजण हॉटेलमधून बाहेर पडत असल्याचे दिसून आले त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला.एका बियर शॉपी ₹वर नेहाने बियर घेतल्याचे सुद्धा सीसीटीव्ही मध्ये दिसून आले, आपल्याच नवऱ्याला प्रियकराच्या मदतीने दारू पाजून खून केला असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानंतर हा मृतदेह विहिरीत फेकला.मृतदेह पालगड पाटील वाडीतून दापोली रुग्णालयात या आणण्यात आला. संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतलेला मंगेश चिंचघरकर हा बस चालक आहे. मंडणगड डेपोची बस दापोलीला वस्तीला घेऊन आला असता, त्याला दापोली पोलिसांनी सापळा रचून पकडले आहे. अधिक पोलीस करत आहेत..

Google search engine
Previous articleखेडमध्ये वाळू माफिया जोमात, महसूल यंत्रणा कोमात ? बांदरी पट्ट्यात होतोय शेकडो ब्रास वाळूचा अवैध उपसा
Next articleभोर घाटात भीषण अपघात, १०० फूट दरीत कोसळली इको कार, अपघातात एकाच मृत्यू तर ५ जण जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here