रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यात अवैधरित्या खनिज उत्खननाचा सुळसुळाट पहाला मिळत आहे.प्रामुख्याने रेती माफिया,चिरेखान माफिया, माती माफिया यांना बिना राॅयल्टी परवानगी दिल्याची समजते.आता पर्यंत रेतीचे टेंडर हे फक्त हातपाटी व्यावसायिकांना मिळत होते.मात्र दापोली मध्ये तर टेंडर सोडाच त्या आधीच सक्शन मशीनने दिवसरात्र खाडीचे उत्खनन चालू आहे.दाभोळ खाडीच्या हर्णे या पर्यटन स्थळापुढे अंजार्ले,येथे बत्तीस रेती माफिया सक्शन बोट,व पोकलेनच्या सहाय्याने रेती उपसा करीत आहेत.तसेच दाभोळ हद्दीतील भोपण येथे अंतुले नामक रहीवासी अनेक वर्षे शासनाला न जुमानता वाळू माफिया कस्टमच्या नियंत्रणात असलेली जागा कांदळवन तोडून खुशाल अवैध रेती उत्खनन करीत आहेत.यांच्या घराच्या आवती भोवती लाखोंच्या ब्रासने रेजगा पडलेली पहाला मिळते मग हा रेजगाच इतका असेल तर रेती उपसा किती असावा याची कल्पनाच करता येणार नाही.असे लाखो टन रेजगा सरकारी खाजन जे कस्टमच्या नियंत्रणात आहे तेथे कोणताही वचक न रहाता प्रशासनाच्या जागेत अनधिकृत भराव करून तेथे रेती माफियांचे साम्राज्य वाढले आहे.हे प्रशासनाच्या लक्षात येत नाही का..?लगतच मोहल्ला जवळ एम्.एम्.बी.ची तरी,ची जेटी आहे लागून पुल आहे.त्यासाठी शासनाच्या करोडोंचा निधिचा वापर करून बांधलेल्या ठिकाणी सततचे रेती उत्खनन चालू राहिले तर शासनाचे खुप मोठी नुकसान होऊन वापरलेल्या निधीत जनतेचा अमाप पैसा पाण्यात जाऊन कधी न भरुन येणार नुकसान जनतेच्या माथी पुन्हा लादल जाईल.त्यातच शासनाचा करोडोंची रॉयल्टी बुडत आहे. याला जबाबदार कोण..? असा प्रश्न आता स्थानिकांमधून विचारला जात आहे. अवैध धंद्यावर दंडात्मक कारवाईची मागणी आता जनतेतूनच होत असल्याने जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासन आणि वन विभागाने याकडे लक्ष देऊन बेकायदेशीर अवैध धंद्यावर त्वरित दंडात्मक कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे.