दापोली तालुक्यातील भोपण खाडीत रायगड जिल्ह्यातील दोन वाळु माफियांनी सक्शन पंपाद्वारे बेकायदा वाळू उत्खलन स्थानिक भागीदार यांच्या संगनमताने करत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे दापोली महसूल विभागाने कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत असा आरोप केला जात आहे. या खाडीत राजरोस लाखो रुपयांची वाळू बिनदास्त पणे उत्खलन करून चोरीला जात असून याला कुणाचे राजकीय वरदहस्त आहे का? अस ही बोललं जातं आहे. मागील दोन दिवसांपूर्वी दापोली महसूल विभागाने वाळू उपशाच्या इराद्याने ठेवले पंप, लोखंडी पाईप अन्य साहित्य खाडीत बुडविले होते मात्र या कारवाई नंतरतही याच ठिकाणी पुन्हा रात्रंदिवस चक्क सक्शन पंपाने वाळूचा उपसा सुरू आहे. हा सक्शन पंप, वाळू उपशाची बोट खाडीत आहे, तर जेसेबीच्या साह्याने,वाळूचे डंपर भरले जात आहेत. त्यामुळे येथे कारवाई करण्यासाठी दापोली महसूल विभागावर कुणाचे दडपण आहे का? खरेंतर कोणत्याही खाड्डीत सक्शन पंपाने वाळूचे उत्खलन करण्यास बंदी असताना देखील कारवाई होत नसेल तर याला आर्शिवाद कोणाचे? बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या माफियाचे दापोली महसूल विभागात रोजची ये जा असून महसूल यंत्रणाच आपण विकत घेतली आहे असा अविर्भाव वावरत असताना दिसत आहेत. दापोली महसूल विभागाने बेकायदेशीर वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल पथक तयार केले आहे. मात्र तेही काहीच कारवाई करत नाहीत त्यामुळे बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. या उत्खलनातून लाखोंची माया जमविण्यासाठी हे माफिया यशस्वी होत आहेत हि शासकिय लाखो रुपयाची महसुली रॉयल्टी दापोली महसूल विभाग कोणाच्या आर्शिवादाने कोणाच्या खिशात घालत आहे? असा सवाल स्थानिक पातळीवर चर्चेचा विषय बनला आहे