दांडिया खेळता खेळता विद्यार्थिनीचा मृत्यू, पाचल हळहळले
नवरात्रोत्सवात उत्सवात परिसरावर शोककळा
रत्नागिरी – कोकणात राजापूर तालुक्यात पाचल येथे दांडिया खेळता खेळता एका विद्यार्थिनीला चक्कर आली. शिक्षकांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र दुर्दैवाने या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी व धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ऐन नवरात्रोत्सवात राजापूर पाचल परिसरावर शोककळा पसरली आहे.