Crack Heels Solution : थंडीत टाचांना भेगा पडल्यानं पाय दुखतात? ‘या’ ३ सोप्या उपायांनी भेगा निघून टाचा होतील मऊ

- Advertisement -

हिवाळा सुरु झाला की ओठ कोरडे पडणं, पायांना भेगा पडणं असा त्रास जाणवू लागतो. (Winter care Tips) भेगा पडलेल्या टाचांमुळे तुमचे पाय खूप खराब दिसू लागताl आणि तुम्हाला अस्वस्थ वाटतं.

टांचांना तीव्र भेगा पडल्या तर खाज आणि वेदना जाणवतात. ज्यामुळे चालणे देखील कठीण होते. थंड हवामान, दीर्घकाळ उभे राहणे, अस्वस्थ्य आहार आणि जीवनशैलीच्या चुकीच्या सवयी, जमिनीवरील बारीक धूळ यामुळे टाचांना भेगा पडतात.

भेगा पडलेल्या टाचांसाठी काही घरगुती उपाय आहेत ज्यामुळे तुमच्या टाचा आधीपेक्षा अधिक चांगल्या दिसू शकतात. (Home made remedy for cracked heels ) उपाय करण्याची पहिली पायरी म्हणजे कडक झालेली मृत त्वचा (Dead Cells) काढून टाकणे. आपले पाय कोमट पाण्यात भिजवा आणि थोडेसे समुद्री मीठ त्यात घाला. पाय 10 मिनिटे भिजवा. टाचांची मृत त्वचा कॅलस रिमूव्हरने एक्सफोलिएट करा.

ग्लिसरीन आणि गुलाब पाणी

ग्लिसरीन त्वचेला मऊ करते, गुलाब पाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. गुलाब जल आणि ग्लिसरीन सम प्रमाणात एकत्र करून आपल्या टाचांना लावा. हे मिश्रण लावण्यापूर्वी पाय स्वच्छ करून कोरडे करा. असे नियमित केल्याने टाचांच्या भेगा कमी होतात.

नारळाचं तेल

नारळाचं तेल पाय आणि घोट्यासाठी एक उत्तम मॉइश्चरायझर आहे. तुमचे पाय गुळगुळीत ठेवण्यासाठी आणि पायात बुरशी येऊ नये म्हणून दररोज याचा वापर करा. थोडे नारळ तेल किंवा ऑलिव्ह तेल घ्या. मृत त्वचेच्या पेशी बाहेर काढल्यानंतर आपल्या टाचांना मसाज करा. क्रॅक निघून जाईपर्यंत हे रिपीट करा. आठवड्यातून एकदा एक्सफोलिएशन करणे आवश्यक आहे. तेल लावण्यापूर्वी दररोज आपले पाय धुवा आणि कोरडे करा.

कडुलिंब

टाचांवर तीव्र भेगा पडून खाज सुटली आणि सूज येत असेल, तर कडुनिंबाची पाने आणि हळद यांची पेस्ट लावणे हा उत्तम उपाय आहे. कडुलिंबाची पाने आणि हळदीमध्ये प्रतिजैविक आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. काही कडुलिंबाची पाने घेऊन बारीक करून त्यात थोडी हळद मिसळा आणि भेगा पडलेल्या टाचांवर लावा. 30 मिनिटे राहू द्या आणि कोमट पाण्याने पाय धुवा. या घरगुती उपायांनी पायांवर आलेला कठोरपणा दूर होऊन भेगा कमी होण्यास मदत होईल. हे उपाय करूनही तुम्हाला बरं वाटत नसेल किंवा त्रास आणखाी वाढत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

12,546FansLike
75,569FollowersFollow
2,564FollowersFollow
191,558SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles