मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे कोरोनाचा धोका मात्र टळलेला नाही. बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला कोरोनाची लागण झाली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर ट्विट करून कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे.
उर्मिला मातोंडकरने ट्विट करत म्हटले आहे की, “मी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. आता होम क्वारंटाईनमध्ये स्वतःला आयसोलेटेड केले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना मी विनंती करते की त्यांनी ताबडतोब स्वतःची चाचणी करावी. दिवाळीच्या खास मुहूर्तावर प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यावी.
रंगीला,प्यार तुने क्या किया, भूत तसेच पिंजर सारख्या चित्रपटात उर्मिलाने दमदार भूमिका साकारल्या आहेत. ‘नरसिम्हा’ हा उर्मिलाचा पहिला चित्रपट होता.मोठा पडद्यापासून दूर झाली असली तरी ती सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. उर्मिला मातोंडकरने तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून सांगितले की तिला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या तिने स्वतःला क्वारंटाईन केले असून तिची प्रकृती स्थिर आहे.