रत्नागिरी : राज्यभर पावसाचा(Heavy Rain) जोर चांगलाच वाढला आहे. राज्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईतही धो धो पाऊस पडत आहे.
याचा परिणाम रेल्वे आणि रस्ते वाहतूकीवर झाला आहे. मुंबईत लोकल सेवा विस्कळीत झाली असताना कोकण रेल्वेलाही याचा फटका बसला आहे. कोकण रेल्वेची(Konkan Railway) वाहतूक विस्कळीत झाली आहे.चिपळूणजवळ( Chiplun) रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली आहे. यामुळे याचा परिणाम कोकण रेल्वेच्या वाहतूकीवर झाला आहे. या मार्गावरील अनेक गाड्या खोळंबल्या आहेत. घटनास्थळी रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले असून दरड हटवण्याचे काम सुरु आहे.
अंजनी-चिपळूण दरम्यान रेल्वे ट्रॅक वरती दरड कोसळली आहे. यामुळे रेल्वे ट्रॅक वर दगडी कोसळली आहेत. परिणामी कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरु केले आहे. सध्या युद्ध पातळीवर दरड बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुढच्या अर्ध्या तासात दरड हटवण्यात येतील. यानंतर रेल्वे ट्रॅक सुरळीत सुरु होईल असा दावा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.
महाराष्ट्रातील अनेक जिह्ल्यांना 16 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा
हवामान खात्याकडून पुढील 48 तासांत महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, कोल्हापूर, गडचिरोली या जिल्ह्यांना 16 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मुळे महत्त्वाच्या कामाव्यतरिक्त घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा रद्द, पुणे, ठाणे, पालघरसह राज्यात अनेक जिल्ह्त्यात शाळांना सुट्टी
अतिवृष्टीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून 14 जुलै रोजी मुंबई विद्यापीठाच्या(Mumbai University) सर्व परीक्षा(Exam) रद्द केल्या आहेत. तर पुणे, ठाणे, पालघरसह राज्यात अनेक जिल्ह्त्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
रत्नागिरी-मुंबई मार्गावरील परशुराम घाट 10 दिवसांनी सुरु
रत्नागिरी- मुंबई-गोवा मार्गावरील परशुराम घाट वाहतुकीसाठी सुरू झाला आहे. 10 दिवसानंतर परशुराम घाट सुरू झालाय. दरडी कोसळत असल्याने अवजड वाहतुकीसाठी घाट बंद केला होता.
अणुस्कूराघाटातील वाहतूक पुर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे
रत्नागिरीतील अणुस्कूरा घाटात कोसळलेली दरड अद्याप हटवलेली नाही. पावसामुळे प्रचंड व्यत्यय येत असल्याचे समजले आहे.
त्यामुळे अणुस्कूराघाटातील वाहतूक पुर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. राजापूर मार्गे कोल्हापूरला जोडणारा हा घाट बंद आहे. मुसळधार पावसाचा परिणाम कोकणातील घाट रस्त्यांवर देखील झाला आहे. मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे कोकण पट्ट्यात नद्यांना पूर आला आहे. त्याचबरोबर घाट रस्त्यातील अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत.