चिपळूण – मार्च महिन्यापासून विविध सण सुरू होत आहेत, गुढीपाडवा, रमजान ईद, रामनवमी, आंबेडकर जयंती या सणांच्या पार्श्वभूमीवर समाजामध्ये जनजागृती, सामाजिक ऐक्य टिकून राहावं आणि स्थानिक पोलीस प्रशासनाची भूमिका दिसावी या हेतूने चिपळूण पोलीस ठाण्यात यावतीने मॉक ड्रिल घेण्यात आले. शहरातील पवन तलाव मैदानावर दंगा काबू मोहीम राबवण्यात आली. यावेळी जमवलेल्या नागरिकांच्या जमावावर कशा प्रकारे कारवाई करावी त्याची प्रात्यक्षिके देण्यात आली. चिपळूणचे डीवायएसपी राजेंद्रकुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनानुसार आणि पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या सूचनेनुसार हे मॉक ड्रिल पार पडले. पवन तलाव मैदानापासून चिपळूण नगरपालिकेपर्यंत हे मॉक ड्रिल घेण्यात आले. यावेळी डीवायएसपी राजेंद्र राजमाने पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे व अनेक पोलीस अधिकारी कर्मचारी, चिपळूण नगरपालिकेचे अग्निशमन दलाचे कर्मचारी व चिपळूण आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
Chiplun Police Mock Drill