चिपळूण – चिपळूणात आज सकाळी घडलेल्या एका धक्कादायक हिट अँड रन घटनेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. काविळतली भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्याच्या मुलाने भरधाव इनोव्हा क्रिस्टा गाडीने एक पादचारी नागरिक उडवला. या भीषण अपघातात रमेश कळकुट्टी (वय 50) यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर गाडीचा चालक अभिजीत जयंत खताते हा घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी करत संताप व्यक्त केला. चालकाने मदत करण्याऐवजी पळ काढल्यामुळे “नेत्यांच्या मुलांना कायद्याचा धाक नाही का?” असा थेट सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला.

या घटनेमुळे कोकणातही बेफाम वाहनचालकांमुळे होणाऱ्या अपघातांवर चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत कारवाई सुरू केली असून, आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. नागरिकांनी काही काळ रस्ता अडवून निषेध देखील नोंदवला. या प्रकरणात संबंधित व्यक्तीला लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

#चिपळूणहिटअँडरन #चिपळूणअपघात #नॅशनलिस्टकाँग्रेसपार्टी #कोकणबातमी #राष्ट्रवादीचामुलगा #इनोव्हाक्रिस्टाअपघात #पादचारीअपघात #HitAndRunChiplun #KokanNews #mazekokan #RameshKalkutti #AbhijitKhatate #चिपळूणपोलीस #RoadAccident #MaharashtraNews

Google search engine
Previous articleपनवेल महापालिकेची ‘अभय योजना’: मालमत्ता करावरील शास्ती माफीत मोठा दिलासा
Next article‘रत्नागिरी रील स्पर्धा 2025’ मध्ये प्रथमेश पवार यांचा डंका! अभिनय, छायांकन आणि द्वितीय क्रमांकाचे तिहेरी यश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here