चिपळुण – शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला झाला यावेळी त्यामध्ये पेट्रोलची बाटली मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी पेट्रोल पंपचालकांना कडक सूचना दिल्याने आता बॉटलमधून पेट्रोल मिळणे बंद झाले आहे. यामुळे मोटारसायकल चालकांचे हाल होत आहेत. पेट्रोल-डिझेल अभावी एखादी गाडी बंद पडली जाते. त्यावेळी किमान पेट्रोल पंपावर येणासाठी बॉटल अथवा कॅनमधून पेट्रोल-डिझेल दिले जात होते. मात्र पेट्रोल पंपचालकांनी अचानक पेट्रोल देणे बंद केल्याने मोठी गौरसोय झाली आहे. गाडी ढकलत पंपावर आणावी लागत आहे. मात्र मोठ्या गाड्या आणणे अशक्य होत आहे.