१० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहेत. दहावी-बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणार आहे. दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२५ ते १७ मार्च २०२५ या काळात होणार आहे. तर बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी २०२५ ते १८ मार्च २०२५ या काळात होणार आहे. याबाबत सविस्तर वेळापत्रक २१ तारखेला म्हणजे आजपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाकडून संकेतस्थळावर (www.mahahsscboard.in) प्रकाशित करण्यात आले आहे. दहावी-बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष असते.परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरुपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरूनच विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तारखांची खात्री करून परीक्षा द्यावी. अन्य संकेतस्थळांवरील किंवा यंत्रणेने छपाई केलेले, व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून प्रसिद्ध झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असेही स्पष्ट करण्यात आले.