खेड – रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावर भोस्ते घाटामध्ये महामार्ग लगत ट्रक पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झाल्यानंतर ट्रकचा चालक ट्रक मध्ये अडकूनच राहिला होता . त्याला दोरीच्या साह्याने खेडमधील मदत ग्रुप तसेच रेस्क्यू टीम आणि इतर वाहन चालकांनी सुरक्षित बाहेर काढून प्रसाद गांधी यांच्या रुग्णवाहिकेने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.