मुंबई : येत्या १ नोव्हेंबरपासून बँकिंग नियम बदलणार आहेत. आता तुम्हाला बँकांमध्ये पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी शुल्क भरावे लागेल. बँक ऑफ बडोदा (BOB ) ने याची सुरुवात केली आहे. या बँकेत पुढील महिन्यापासून विहित मर्यादेपेक्षा जास्त बँकिंगसाठी वेगळे शुल्क आकारण्यात येणार आहे. १ नोव्हेंबरपासून ग्राहकांना कर्ज खात्यासाठी १५० रुपये भरावे लागणार आहेत.
या द्वारे खातेदारांसाठी तीन वेळा पैसे जमा करणे विनामूल्य असेल, परंतु जर ग्राहकांनी चौथ्यांदा पैसे जमा केले तर त्यांना ४० रुपये अधिक द्यावे लागतील. दुसरीकडे, जन धन खातेधारकांना यात काहीसा दिलासा मिळाला असून, त्यांना डिपॉझिटवर कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही, परंतु पैसे काढल्यावर १०० रुपये द्यावे लागतील.