ड्रायफ्रूट्समध्ये बदाम फारच लोकप्रिय आहे. मेंदूसाठी बदाम रामबाण उपाय मानला जातो. तसं पाहिलं तर बदामाची झाडे आशिया, इराण, मक्का, शिराज इत्यादी ठिकाणी आढळतात.

जर याचं योग्यप्रकारे सेवन केलं गेलं तर मेंदूच्या न्यूरॉन्सना अॅक्टिव करणं सोपं होतं. जर तुम्हाला माहीत नसेल की, बदामाचं सेवन योग्यप्रकारे कसं करावं तर ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

बदामात टॅनिन नावाचं तत्व असतं. याचं सेवन केल्याने शरीराला बदामातील पूर्ण पोषक तत्व मिळत नाहीत. त्यामुळेच बदामाचं सेवन हे साल काढून करावं.

अनेकदा लोक सुक्या बदामाचं सेवन करतात. असं केल्याने शरीरात पित्ताचं असंतुलन वाढतं. ज्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे बदाम कधीच सालीसोबत खाऊ नका.

सालीसोबत बदान खाल्ल्याने त्याचे काही कण तुमच्या आतड्यांमध्ये जाऊन अडकतात. या कारणामुळे पोटात वेदना, जळवझल, गॅस अशा समस्या होतात. त्यामुळे नेहमीच बदामाची साल काढूनच त्याचं सेवन करावं.

बदामाच्या वापर घरात वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. पण जे लोक रोज बदामाचं सेवन करतात, त्यांच्यासाठी अशाप्रकारे बदामाचं सेवन करणं फायदेशीर ठरू शकतं. त्यासाठी बदाम रात्री भिजवून ठेवा.

सकाळी बदामाची साल काढून त्यांचं सेवन करा. जास्त प्रमाणात बदाम खाल्ल्यानेही समस्या होऊ शकते. त्यामुळे 3 ते 4 बदामच भिजवू घाला आणि सकाळी त्यांचं साल काढून सेवन करा.

बदामाचं सेवन तुम्ही घासून दुधात टाकूनही करू शकता. सोबतच ते रोस्ट करूनही तुम्ही स्नॅक्स म्हणून त्यांचं सेवन करू शकता. डायटिशिअन एका दिवसा 5 ते 8 बदाम खाण्याचा सल्ला देतात.

Google search engine
Previous articleहरिहरेश्वर किनाऱ्यावर संशयास्पद बोट आढळली, जिल्हाभर नाकाबंदी, सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आदेश
Next articleगणपतीपूर्वी शिक्षक, कर्मचाऱ्यांना मिळणार पगार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here