वेगाने धावणाऱ्या एसटीला आग लागल्याची घटना घडली. दोन तरुणांनी मोठ्या प्रयत्नाने चालकाला माहिती देिल्याने या बसमधील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. तरुणांच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली.

औरंगाबाद : प्रवाशाना घेऊन जाणाऱ्या धावत्या बसला अचानक आग लागली.मात्र चालक अनभिज्ञ होता. हा प्रकार पाहून दोन दुचाकी स्वार तरुणांनी बसचा पाठलाग करीत तिला थांबवून आग विझवली यामुळे पुढील अनर्थ टळला. ही घटना औरंगाबाद- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील रोटेगाव उड्डाणपुलावर घडली.वाशीम-नाशिक ही एसटी बस क्रमांक एमएच ४० वाय ५६६१ नाशिककडे जात असताना खंडाळानजीक बसच्या पाठिमागून अचानक धूर निघायला लागला. काही वेळातच बसने पेट घेतला व आगीचे लोळ बाहेर पडताना दिसू लागले. त्याचवेळी वैजापूर येथील माजिद शेख व सचिन साकला हे दोघेजण दुचाकीवरून खंडाळा येथून वैजापूरकडे येत होते. त्यांना हा प्रकार निदर्शनास आल्याने त्यांनी बसचा पाठलाग सुरू केला.

एसटी बसचा वेग जास्त असल्यामुळे त्यांना पाठलाग करणे अवघड जात होते. बसने मागून पेट घेतला. परंतु चालकाला त्याची कल्पनाही नव्हती. या दोघांनी कसाबसा पाठलाग करून बस शहरानजीकच्या रोटेगाव उड्डाणपुलावर थांबवून चालकाला ही माहिती दिली. त्यामुळे चालकाने प्रसंगावधान राखून सर्वप्रथम ३० प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. यानंतर अग्निरोधक यंत्राच्या साह्याने आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.या घटनेची माहिती वैजापूर पोलिस ठाण्यासह अग्निशमन दलास कळवण्यात आली होती. काही वेळातच दोन्हीही यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. तोपर्यंत बसमधील आग नियंत्रणात आणण्यात यश आले होते. तरुणांनी प्रसंगावधान दाखवत बस चालकाला वेळीच माहिती दिल्याने पुढील अनर्थ टळला.

Google search engine
Previous articleफडणवीस नशीबवान; अडीच वर्षांत ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेतेही झाले; ‘दादां’चा टोला
Next articleदरड कोसळल्याने वाहतूक बंद; परशुराम घाटाचे काम कधी पूर्ण होणार?, हायकोर्टाचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here