सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे (Ashwini Bidre) हत्याप्रकरणात पनवेल सत्र न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. मुख्य आरोपी आणि माजी पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर (Abhay Kurundkar) याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे.
२०१६ साली अश्विनी बिद्रे (Ashwini Bidre) अचानक बेपत्ता झाल्या होत्या. पुढील तपासात त्यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात त्यांचा सहकारी असलेला अभय कुरुंदकर (Abhay Kurundkar) हा संशयित ठरला होता. त्याच्यावर आरोप होता की त्याने अश्विनीचा (Ashwini Bidre) खून करून पुरावे नष्ट केले. पनवेल सत्र न्यायालयाने अभय कुरुंदकरला (Abhay Kurundkar) हत्या केल्याचा आरोप ठेवत दोषी ठरवले आहे. या प्रकरणात एक अन्य आरोपी निर्दोष ठरला आहे. तर इतर दोघांना पुरावा नष्ट केल्याचा आरोप ठेवत दोषी ठरवले आहे. त्याबाबत शिक्षा ही 21 एप्रिल रोजी च्या सुनावणीत देणार आहे. निकालानंतर अश्विनी बिद्रे (Ashwini Bidre) यांच्या कुटुंबीयांनी न्याय मिळाल्याचे समाधान व्यक्त केले.