अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अडचणींमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. सलग २ दिवस आर्यनच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. गुरूवारी आर्यनसाठी महत्त्वाचा दिवस आहे. महत्त्वाचं म्हणजे २८ ऑक्टोबर किंवा २९ ऑक्टोबरपर्यंत आर्यनला जामीन मंजूर झाला नाही तर आर्यनला पुढचे १६ दिवस कोठडीत काढावे लागतील. त्यामुळं आर्यनसाठी गुरूवीर आणि उद्याचा शुक्रवार दिवस फार महत्त्वाचा आहे.

२९ ऑक्टोबरनंतर न्यायालयचं कामकाज दिवाळीच्या सुट्टीमुळं बंद राहणार आहे. त्यामुळं न्यायालयाला दिवाळी आधी आर्यनच्या केसवर निर्णय देणं गरजेचं आहे. जर आर्यनला जामीन मंजूर झाला नाही तर त्याला १५ नोव्हेंबरपर्यंत कोठडीत राहावं लागेल. न्यायालयाच्या दिवाळीच्या सुट्ट्या १ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू होत आहेत.

१ नोव्हेंबर ते ६ नोव्हेंबर पर्यंत दिवाळीच्या सुट्ट्या असणार आहेत. १ ते १२ नोव्हेंबर पर्यंत न्यायालयाचं कामकाज बंद राहणार आहे. १३ – १४ नोव्हेंबर शनिवार-रविवार असल्यामुळं न्यायालय बंद असणार आहे. दिवाळीच्या सुट्टीपूर्वी २९ ऑक्टोबर हा मुंबई उच्च न्यायालयाचा शेवटचा कामकाजाचा दिवस आहे. यानंतर १५ नोव्हेंबरला मुंबई उच्च न्यायालय सुरू होणार आहे.

आर्यन खानसोबत अरबाझ मर्चंट आणि मूनमून धामेचा यांच्या जामीन अर्जावरही सुनावणी होणार आहे. मुंबईत समुद्रात क्रुझवर ड्रग्स पार्टी करणाऱ्या आर्यन खानसह ८ जणांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या (NCB) अधिकाऱ्यांनी २ ऑक्टोबरला अटक केली होती. त्यामुळं या २ दिवसांत स्टारकिडला जामील मिळाला नाही तर त्यांच्या अडचणी वाढणार अशी शक्यता नाकारता येत नाही.

Google search engine
Previous articleगृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना कोरोनाची लागण
Next articleखबरदार! दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोविड डोकं वर काढू नये यासाठी राज्य सरकारचे ‘हे’ आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here