आधी वेंदाता, मग बल्क ड्रग पार्क आणि आता टाटा एअर बसचा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यांनतर विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारला धारेवर धरलंय. अशातच महाराष्ट्र देखील गुजरात मध्ये विलीन करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्लॅन असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. अशातच आता आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर गेला आहे.महाराष्ट्रातून सॅफ्रन कंपनीचा हा प्रकल्प हैदराबादला गेला आहे. जमीन मिळण्यास दिरंगाई झाल्यामुळे हा प्रकल्प बाहेर गेला आहे. 1115 कोटींची प्राथमिक गुंतवणूक असणारा हा पकल्प हैदराबादला गेला. सॅफ्रन कंपनीचा हा प्रकल्प होता. विमान आणि रॉकेट यांचं इंजिन बनवणारी ही कंपनी होती. या प्रकल्पाच्या जाण्यामुळे राज्यातील 500 ते 600 कामगारांचा रोजगार बुडाला आहे.
विमान आणि रॉकेटचे इंजन बनवणारी फ्रान्सची बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रनने महाराष्ट्रातून काढता पाय घेत हा प्रकल्प हैदराबादला वळवला आहे. सॅफ्रन कंपनी नागपूरच्या मिहानमध्ये विमान इंजनाच्या देखभाल दुरुस्तीचा युनिट बनवणार होती.सॅफ्रन कंपनी मिहानमध्ये 1 हजार 185 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यार होती. मात्र आता हा प्रकल्प हैदराबादला जाणार असल्याची माहिती आहे.तर याआधी टाटा एअरबस हा प्रकल्प राज्याबाहेर गेलाय. नागपुरात होणारा हा प्रकल्प आता गुजरातला हलवण्यात आला आहे.या प्रकल्पाचं आज भूमिपूजन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे भूमीपूजन केलं जाणार आहे.प्रकल्प कुणामुळे राज्याबाहेर जात आहे, याबाबत सत्ताधारी-विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत राहतील, पण महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम नाही, याकडे कुणी लक्ष देणार आहे का ? असा प्रश्न विचारला जात आहे.