रोहा, रायगड : रोहा शहरात वास्तव्यास असणारे रहिवासी श्री.व सौ. सीमा संजय शेठ यांची कन्या कु.अंकिता संजय शेठ हिने इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया मार्फत घेतली जाणारी राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेची व कठीण समजली जाणारी चार्टर्ड अकाउंटंट परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण होऊन उज्वल यश संपादन केले आहे. त्यामुळे रोहा शहराच्या शिरपेच्यात आणखी एक भर पडलेली आहे.
कु. अंकिताने सातत्यपूर्ण परिश्रम, प्रबळ आत्मविश्वास आणि आई- वडील सौ.सीमा संजय सेठ, आजी वनिता मदन सेठ तसेच दादा-वाहिनी यांच्या मोलाच्या पाठबळामुळेच हे यश संपादन केले असे अंकिताने आवर्जून सांगितले. तिचे नातेवाईक, मित्रपरिवार, शिक्षकवृंद तसेच रोहा शहरासह तालुका भरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कु. अंकिता संजय शेठ हिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. त्याच बरोबर तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.