पेणचे भूमिपुत्र तथा महाराष्ट्रराज्य पोल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष अनिल खामकर यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई रायगड जिल्हा आयोजित वर्धापनदीन निमित्ताने महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा शेतकरी संघटना या पुरस्काराने गौरविण्यात आले. अनिल खामकर हे नेहमीच पोल्ट्री व्यावसायिक व सामाजिक कार्यासाठी अग्रेसर राहिले आहेत. गोरगरीब लोकांना सहकार्य करण्यासाठी ते नेहमी पुढाकार घेतात.
कोरोना काळातील त्यांचे योगदान वखाणण्याजोगे आहे. कोरोना काळात पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी संकटात असताना व चिकन खाण्याची नागरिकांमधील भीती दूर करण्यासाठी त्यांनी पेण येथे मोफत चिकन फेस्टिवलचे आयोजन केले होते. येईल त्या नागरिकांना मोफत चिकन फ्राय व बिर्याणीचा आस्वाद देऊन चिकन विक्रीसाठी व चिकन खाणाऱ्या लोकांमध्ये जनजागृती करण्याचे योग्यवेळी योग्य काम केले व त्याचा परिणाम म्हणून दुसऱ्याच दिवसापासून चिकन विक्रीत वाढ होऊ लागली. यामुळे अनेक पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी आर्थिक संकटातून बाहेर निघाले.
अनिल खामकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील तळागाळातील पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी एकत्र करून शेतकऱ्यांची तालुका, जिल्हा तसेच संपूर्ण महाराष्ट्राची शेतकरी पोल्ट्री योद्धा कुक्कुटपालन संघटना उभारली व सर्वानुमते त्यांची या संघटनेच्या महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून निवड झाली. यानंतर त्यांनी पोल्ट्री व्यवसायात येणाऱ्या अनेक त्रुटी दूर करून त्याची शासनास भाग पाडले. यामुळे दरमाही उत्पन्नात वाढ होऊ लागली. पोल्ट्रीसाठी आकारण्यात येणारा ग्रामपंचायत कर कमी केला. यामुळे त्यांना दिलेला पुरस्कार हा अगदी योग्य आहे असे मत पेण तालुका शेतकरी पोल्ट्री योद्धा अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे व मॅनेजिंग डायरेक्टर विलास साळवी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या पुरस्काराचे खरे हक्कदार माझे सर्व महाराष्ट्रातील पोल्ट्रीधारक शेतकरी आहेत ज्यांच्या सहकार्यानेच मला हा पुरस्कार मिळाला असे मत अनिल खामकर यांनी पञकार प्रतिनिधिशी बोलताना व्यक्त केले.