मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर तेरा तासाच्या चौकशीनंतर ईडीनं अटक केली आहे. काल दुपारी बारा वाजताच्या दरम्यान अनिल देशमुख हे ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले होते. यानंतर संध्याकाळी आठ वाजताच्या दरम्यान ईडीचे जॉईंट डायरेक्टर सत्यव्रत कुमार हे दिल्लीवरून थेट ईडी कार्यालयात दाखल झाले होते. त्यांनी देखील अनिल देशमुख यांची चार तास चौकशी केली आणि अखेर रात्री एकच्या दरम्यान देशमुख यांना ईडीने अटक केली. याची माहिती रात्री सत्यव्रत कुमार यांनी दिली.

अनिल देशमुख यांना अटक केल्यानंतर रात्री ३ वाजेपर्यंत अनिल देशमुख हे त्यांचे वकील इंद्रपाल सिंग यांच्याशी चर्चा करत होते. रात्री ३ वाजताच्या दरम्यान वकील इंद्रपाल हे देखील ईडी कार्यालयामधून बाहेर पडले, तेव्हा त्यांनी आपण या अटकेला न्यायालयात विरोध करणार आहोत, अशी माहिती दिली. आज सकाळी १० वाजता देशमुख यांना वैद्यकीय तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तिथून ठीक ११ वाजता त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.किमान सात दिवसांची तरी ईडी न्यायालयात देशमुख यांची कोठडी न्यायालयात मागण्याची शक्यता आहे.

गेल्या बऱ्याच काळापासून नॉट रिचेबल असणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या रिचेबल झाले होते. त्यांनी आपला जबाब ईडीसमोर नोंदवला. तब्बल तेरा तास त्यांची चौकशी सुरु होती.अखेर चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. मनी लॉन्ड्रींग प्रकरणी अनिल देशमुख ईडीच्या रडारवर आहेत. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकं आणि १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपांनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि आयपीएस अधिकारी परमबीर सिंह हे वेगवेगळ्या तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. पण हे दोघेही तपास यंत्रणांच्या हाती मात्र लागत नव्हते. चार ते पाच वेळा समन्स बजावल्यानंतरही अनिल देशमुख ईडीसमोर हजर न राहिल्यामुळं त्यांच्या नावानं लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं. तसेच अनिल देशमुखांचा शोध घेण्यासाठी ईडीनं सीबीआयकडे मदत मागितली होती. अशातच काल अनिल देशमुख स्वतः ईडीसमोर आपला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहिले.

Google search engine
Previous articleसचिन वाझेला ६ नोव्हेंबरपर्यंत गुन्हे शाखेची कोठडी;गुन्हे शाखेने १० दिवसांच्या कोठडीची केली होती मागणी
Next articleदिवाळी २०२१ : आज धनत्रयोदशी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here